ताज्या बातम्या
Nashik : नाशिकमधील गोदावरी नदीची पूरस्थिती कायम
नाशिकमधील गोदावरी नदीची पूरस्थिती कायम असल्याचे पाहायला मिळत आहे.
महेश महाले, नाशिक
नाशिकमधील गोदावरी नदीची पूरस्थिती कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. गंगापूर धरणातून 8 हजार 100 क्युसेक वेगाने विसर्ग करण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे. गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.
नाशिकमध्ये पावसाची संततधार पाहायला मिळत असून नाशिकमध्ये 24 तासांत 105 मिमी पावसाची नोंद झाली आहे. यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच गोदावरी दुथडी भरून वाहिली असल्याची माहिती मिळत आहे.
याच पार्श्वभूमीवर महापालिकेकडून आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज झाले असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.