सत्यजित तांबे आज काय भूमिका घेणार?
नाशिक पदवीधर निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांचा मोठ्या मताने दणदणीत विजय झाला आहे. या विजयानंतर लवकरच मी राजकीय भूमिका स्पष्ट करेन अशी पहिली प्रतिक्रिया सत्यजित तांबे यांनी दिली. आज त्यांची भूमिका ते स्पष्ट करणार आहेत. काँग्रेसशी मतभेद झाल्यानंतर त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला होता. त्यामुळे आता नेमकी सत्यजीत तांबे पुढे काय भूमिका घेणार?याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे.
“मतांची टक्केवारी कमी झाली. सोमवारचा दिवस होता, वर्किंग डे होता. अनेक लोक मतदानासाठी येऊ शकले नाहीत. त्यामुळे अपेक्षेपेक्षा कमी मतं आहेत. पण मिळालेल्या यशामुळे आम्ही समाधानी आहोत. आमच्या परिवाराने कायम राजकारण निवडणुकीपुरतं केलं आहे. निवडणुकीनंतर आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याचं काम केलं आहे. त्यामुळे सगळ्याच पक्षाचे लोक आम्हाला मदत करत असतात. “माझ्या वडिलांनी गेल्या १४ वर्षांपासून या मतदारसंघात कामाच्या, जनसंपर्काच्या माध्यमातून जनतेची मनं जिंकण्याचं काम केलं. हाच ऋणानुबंध पुढे नेण्याचं काम मी करेन. सर्वच राजकीय प्रश्नांच्या बाबतीत मी ४ तारखेला माझी भूमिका स्पष्ट करेन. असे सत्यजित तांबे म्हणाले होते.
मुळे आता ही निवडणूक जिंकल्यानंतर सत्यजीत तांबे कोणता निर्णय घेणार याची उत्सुकता लागली आहे. सत्यजीत तांबे आज याबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे. त्याबाबतच अजित पवार यांनी सत्यजीत तांबेंना राजकीय भवितव्य पाहण्याचा सल्ला दिला आहे.