PM Modi In Jalgaon: महिला अत्याचारावर पंतप्रधान मोदींनी दिला थेट इशारा, म्हणाले...

PM Modi In Jalgaon: महिला अत्याचारावर पंतप्रधान मोदींनी दिला थेट इशारा, म्हणाले...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज जळगावात ‘लखपती दीदीं’चा मेळावा पार पडला. आज जळगावात ‘लखपती दीदीं’चा मेळावा पार पडला.
Published by :
shweta walge
Published on

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज जळगावात ‘लखपती दीदीं’चा मेळावा पार पडला. आज जळगावात ‘लखपती दीदीं’चा मेळावा पार पडला. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे देखील उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी महिला अत्याचारांच्या वाढत्या गुन्ह्यांबद्दल भाष्य केले. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांवर कठोर शिक्षा देण्यासाठी आमचं सरकार कायदा कडक करत आहे, असे म्हटले.

गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशात महिला अत्याचारावरील गुन्ह्यात मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात बदलापुरात दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला. या प्रकरणावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीकास्त्र डागले. आता महिला अत्याचारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महत्त्वाचे भाष्य केले आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, महिलांवरील होणारे अत्याचार अक्षम्य पाप आहे. दोषी कोणीही असेल त्याला सोडू नका. त्याला कुठल्याही प्रकारे मदत करणारे वाचता कामा नये. पोलीस आणि कुठल्याही स्तरावर कारवाई झाली पाहिजे. सरकार येतील अन् जातील, पण नारी शक्तीकडे लक्ष दिले पाहिजे. महिलांच्या रक्षणासाठी कायदे कठोर केले जात आहे. एफआयआर होत नाही, वेळ लागतो अशा अडचणी येत होत्या. मात्र आता अनेक अडचणी आम्ही न्याय संहितामधून दूर केल्या आहेत. ई-एफआयआर सुरू केल्या आहे. याने गडबड होणार नाही, आता जलद प्रतिसाद मिळेल. फाशी आणि जन्मठेपेची शिक्षा दिली जात आहे. लग्नाच्या नावे फसवणूक होत होती, त्याबाबत कायदा केला आहे. महिलांच्या समस्यांसाठी केंद्र सरकार हे राज्य सरकारच्या सोबत आहे, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

भारत विकसित होत आहे. त्यात महाराष्ट्राची मोठी भूमिका आहे. महााराष्ट्र विकसित भारताचा चमकता तारा आहे. गुंतवणूकदारांच्या आकर्षणाचं केंद्र आहे. महाराष्ट्राचं भवितव्य सर्वाधिक गुंतवणुकीत आहे. महायुतीचं सरकार म्हणजे गुंतवणूक आणि नोकरीची गॅरंटी आहे”, असेही नरेंद्र मोदींनी सांगितले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com