वेदांता प्रकल्पाबाबत विरोधी पक्षांच्या नेत्यांची नार्कोटेस्ट करा : राम कदम
वेदान्त-फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्कनंतर टाटा एअरबसचा मोठा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राजकीय वर्तुळातून यावर प्रतिक्रिया यायल्या लागल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजपा नेते राम कदम यांनी विरोधी पक्षातील नेत्यांची नार्कोटेस्ट करावी, अशी मागणी केली आहे.
राम कदम यांनी ट्विट करत असे म्हणाले आहेत. ते म्हणाले की, “एअरबस आणि वेदान्त-फॉक्सकॉनवर खोटं बोलणाऱ्या प्रमुख सर्वच विरोधी पक्षांच्या नेत्यांची नार्कोटेस्ट करावी, वेदान्त फॉक्सकॉनच्या टीमने तळेगावला जागा निश्चित करू सुद्धा त्यांना इतर राज्यात का जावे लागले? त्यांच्याकडून कोणी आणि किती टक्केवारी, कमिशन मागितले? कोणत्या पंचतारांकित हॉटेलमध्ये बैठक झाली? बैठकीला कोण-कोण उपस्थित होते?जर या नेत्यांची नार्कोटेस्ट केली तर सर्व वसुलीच्या कहाण्या समोर येतील” असे ते म्हणाले.
यासोबतच “सत्तेच्या काळात ज्यांनी छोट्या मोठ्या हॉटेलवाल्यापासून कॉन्ट्रॅक्टरपर्यंत आणि बदल्यामध्ये किती कोटी रुपये घायचे, याची यादी बनवली होती. ज्यांनी पोलिसांना सुद्धा सोडलं नाही. ते कोटींचे प्रकल्प काही वसुली न करता सोडतील का?” असा सवाल देखिल राम कदम यांनी विचारला आहे.