नारायण राणेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता; ACB करणार चौकशी
नारायण राणे (Narayan Rane) महसूलमंत्री असताना डोंबिवली (Dombivli) येथील प्रीमियम कंपनीची ८६ एकर जमीन १२ करोड रुपयांना एका खासगी बिलडरच्या नावावर केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाचा (Maharashtra Government) खोटा जी. आर. काढून अनंत डेव्हलपर्स या बिल्डरला जमीन विकल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.
या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे माहिती अधिकार कार्यकर्ते -प्रदिप भालेकर यांनी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेऊन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ठाणे विभागाने चौकशीचे आदेश काढले आहेत.
तर दुसरीकडे गणेश नाईक यांच्यावर देखील बलात्कार आणि धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. त्यामुळे आता भाजपच्या अडचणीत वाढ झाली आहे. गणेश नाईक यांच्यावर मुंबई महानगरपालिका निवडणुकांची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे विरोधक त्यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यांवरून त्यांना घेरतील अशी शक्यता निर्माण झाली आहे.