"उद्धव ठाकरेंची परिस्थिती नाचता येईना अंगण वाकडं अशी झालीये"
केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि शिवसेनेतील सामना हा सतत सुरु आहे. एका बाजुने सेनेचे बाण तर दुसऱ्या बाजून राणेंच्या टीकेचे प्रहार ही मालिका काही केल्या बंद होण्याचं नाव घेत नाहीये. अशातच आज महाराष्ट्रदिनी पुन्हा एकदा नारायण राणेंनी शिवसेनेवर (Shivsena) टीका केली आहे. नारायण राणे यांनी आज बाळासाहेब ठाकरे (Balsaheb Thackeray) यांची आठवण काढत सेनेवर निशाणा साधला आहे. बाळासाहेबांनी त्यांच्या हयातीत मोठं काम केलं. कडवट हिंदुत्व आणि मराठी माणसाचं वर्चस्व त्यांच्यामुळे निर्माण झालं मात्र ते काही लोकांना टिकवता आलं नाही असं नारायण राणेंनी म्हटलं आहे.
नारायण राणे यांनी भोंग्याच्या वादावरुनही शिवसेनेवर टीका केली. मुख्यमंत्र्यांनी भोंगे काढावेत, त्याचं धोरण केंद्राने का ठकवावं? असा सवाल उपस्थित करत मुख्यमंत्र्यांची स्थिती नाचता येईना अंगण वाकडं अशी झाली असल्याची टीकाही नारायण राणेंनी केली आहे. तसंच बाबरी मशिद पाडली तेव्हा उद्धव ठाकरे कुठे होते? त्यांचं एक टक्का तरी योगदान तिथे आहे का? असा सवाल नारायण राणेंनी उपस्थित केला आहे.