ताज्या बातम्या
Nanded शासकीय रुग्णालयात पुन्हा 7 जणांचा मृत्यू; अशोक चव्हाणांकडून ट्वीट
नांदेडमध्ये 24 तासांत 24 जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.
नांदेडमध्ये 24 तासांत 24 जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. गंभीर बाब म्हणजे यात नवजात बालकांचाही समावेश आहे. या घटनेवरुन आरोग्य यंत्रणेवर जोरदार टीका करण्यात येत आहे. आता पुन्हा 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
यावर अशोक चव्हाण यांनी ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे. अशोक चव्हाण म्हणाले की, नांदेडमध्ये मृत्यूचे थैमान सुरूच. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात कालपासून आणखी ७ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू. मृतकांमध्ये ४ बालकांचाही समावेश. राज्य सरकारने जबाबदारी निश्चित करावी. असे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.