नांदेड शासकीय रुग्णालयातील मृतांची संख्या 35 वर; अशोक चव्हाण यांच ट्विट
नांदेड शासकीय रुग्णालयातील मृतांची संख्या 35 वर गेली आहे. मृतांमध्ये एकुण 16 बालकांचा समावेश आहे. असं अशोक चव्हाण यांनी ट्विट करत सांगितले आहे. नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील दुर्दैवी घटनेबाबत आज वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची बैठक झाली.
यावेळी आम्ही त्यांना रुग्णालयातील परिस्थितीबाबत विस्तृत माहिती दिली. रुग्णालयाची आरोग्यसेवा प्रभावी करण्यासाठी अनेक तात्कालिक व दीर्घकालीन उपाय सुचवले. दोन्ही मंत्र्यांनी आमच्या भावना जाणून घेतल्या असून, त्यावर लवकरात लवकर योग्य निर्णय घेतले जातील, अशी अपेक्षा आहे.
याप्रसंगी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी या रुग्णालयातील बळींची संख्या ३५ वर गेल्याची माहिती दिली. यामध्ये एकूण १६ बालकांचा समावेश आहे.