मविआत मुख्यमंत्री पदाचा वाद; नाना पटोले यांचा अंबादास दानवे यांना टोला

मविआत मुख्यमंत्री पदाचा वाद; नाना पटोले यांचा अंबादास दानवे यांना टोला

महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदाचा वाद वाढणार आहे. मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबाबत उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेप आहे,
Published by :
shweta walge
Published on

महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदाचा वाद वाढणार आहे. मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबाबत उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेप आहे, हे काँग्रेसला मान्य नसेल तर जाहिर करावं असं वक्तव्य अंबादास दानवे यांनी केलं आहे. यावरच उत्तर देताना नाना पटोले यांनी सांगीतले की मी लहान माणसासोबत बोलत नाही. काल आम्ही उध्दव ठाकरे, शरद पवार साहेब यांच्यासोबत चर्चा झाली आहे.

रामगिरी महाराज यांना कार्यक्रमांत राज्याचे मुख्यमंत्री जातात यावर बोलताना नाना पटोले म्हणाले की राज्यात कायादा व सुव्यवस्था बिघडलेली आहे. तिन तोंडच सरकार आहे. आणी या सरकार बद्दल काही बोलावस वाटत नाही. या सरकारच्या विरोधात जनतेचा राग आहे. आणि ही सरकार कुठल्या महाराजा बद्दल काय काय करते हे त्यानांच माहिती. त्यामुळे असा सरकारला सत्तेतून बाहेर काढावच लागेल

मणिपूर, हाथरस येथिल घटना घडल्यावर राहुल गांधी त्यांच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी राहूल गांधी गेले होतें. पण कोलकत्ता येथिल डॉक्टर प्रकरणात राहूल गांधी का गेले नाही या विषयी नाना पटोले यांनी उत्तर दिलें की हा प्रश्न नरेंद्र मोदी यांना विचारायला पाहिजे मोदी का गेले नाही. राहुल गाँधी यांच जण स्वभाविकच आहे. पण प्रधानमंत्री यांची जबाबदारी नाही का?

काय म्हणाले होते अंबादास दानवे?

मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबाबत उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेप आहे, ते आम्हाला चालणार नाहीत, असे काँग्रेसने जाहीर करावं, असे आव्हान देताना उद्धव ठाकरे यांच्या मागे जनमत आहे. ते महाविकास आघाडीतील एक आश्वासक चेहरा आहे. उलट महाविकास आघाडी आणि महायुती दोघांकडेही उद्धव ठाकरें सारखा चेहरा नाही, अस ते म्हणाले होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com