Nana Patole : माझी लढाई खुर्चीची नाही, माझी लढाई महाराष्ट्राच्या विकासाच्या आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताची आहे

Nana Patole : माझी लढाई खुर्चीची नाही, माझी लढाई महाराष्ट्राच्या विकासाच्या आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताची आहे

नाना पटोले यांनी ट्विट केलं आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

नाना पटोले यांनी ट्विट केलं आहे. ट्विटमध्ये नाना पटोले म्हणाले की, मी विलासराव देशमुख साहेबांचा शिष्य आहे. ते सांगायचे की, वेळेच्या आणि नशिबाच्या जास्त काही मिळत नाही. माझ्या नशिबात असेल तर जे व्हायचे ते होईल. पण मला माझा महाराष्ट्र जो आज पेटतो आहे, तो महाराष्ट्र मला शांत करायचा आहे.

महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील साहेब, विलासराव देशमुख साहेबांच्या काळातला महाराष्ट्र आहे तो पुन्हा आम्हाला उभा करायचा आहे. आज महाराष्ट्रावर 9 लाख कोटीचे कर्ज राज्याच्या सरकारने करुन ठेवलेलं आहे. राज्यातलं सगळं गुजरातला पाठवले आहे. गुजरातचा ड्रग्ज मुंद्रा पोर्टवरुन महाराष्ट्रात आणून आमच्या नवीन पिढीला बरबाद केलं जात आहे. त्यामुळे मला चिंता ती आहे.

यासोबतच ते म्हणाले की, त्यामुळे देवाच्या चरणी मी हीच प्रार्थना करतो, जे काही मिळेलं त्याला चांगल्या पद्धतीने महाराष्ट्राच्या जनतेसाठी माझी लढाई राहिलेली आहे. माझी लढाई खुर्चीची नाही, माझी लढाई महाराष्ट्राच्या विकासाच्या आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताची आहे आणि ती लढत राहीन. असे नाना पटोले म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com