Nana Patole Press Conference
Nana PatoleLokshahi

Nana Patole: छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावरून नाना पटोलेंचा हल्लाबोल, म्हणाले; "सरकार फक्त भीमगर्जना..."

"सध्या राज्यात असलेलं महायुतीचं भाजपप्रणीत सरकार, शिंदेंचं खोके सरकार महाराष्ट्राचा गौरव संपवत आहेत. महाराष्ट्राचा स्वाभिमान संपवत आहेत"
Published by :
Naresh Shende
Published on

Nana Patole Press Conference: सध्या राज्यात असलेलं महायुतीचं भाजपप्रणीत सरकार, शिंदेंचं खोके सरकार महाराष्ट्राचा गौरव संपवत आहेत. महाराष्ट्राचा स्वाभिमान संपवत आहेत. महाराष्ट्रातले उद्योग गुजरातमध्ये पाठवतात. तसच गुजरातमधून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात ड्रग्ज पाठवून महाराष्ट्राची प्रतिमा मलिन केल्याचं काम केलं जात आहे. महाराष्ट्रातील पिढी बर्बाद केली जात आहे. म्हणून आज एक संकल्प आम्ही केला आहे, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला आम्ही धक्का लागू देणार नाही. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं त्यांनी जलपूजन केलं, देशाचे प्रधानमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री त्या जलपूजनात होते. त्याठिकाणी अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक बनवण्याच्या भीमगर्जना त्या काळात केल्या आहेत. पण अजूनपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचं अरबी समुद्रात भव्य स्मारक झालं नाही, असं म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महायुती सरकावर टीका केली.

पत्रकार परिषदेतन नाना पटोले म्हणाले, महाराष्ट्राची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक अवस्था कमकुवत करण्याचं पाप भाजप करत आहे. महाराष्ट्राची संपत्ती गुजरातचे उद्योगपती अदानींना देण्याचं काम त्यांनी केलं आहे. वरळीच्या जागेचा प्रश्न असेल, अनेक ठिकाणच्या जमिनी, संपत्ती अदानीला विकल्या जात आहेत. त्यामुळे महाराष्ट्राला बर्बाद करण्याचं काम महायुती सरकारनं केलं आहे.

काँग्रेसच्या विचाराने यशवंतराव चव्हाण साहेबांनी महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेलं. महाराष्ट्र नाव देऊन महान राष्ट्र केलं. पण या महाराष्ट्राला अधोगतीला नेण्याचं पाप भाजप करत आहे. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला ठेच पोहचू देणार नाही, असा संकल्प आम्ही केला आहे. त्यासाठी काँग्रेस महाराष्ट्रात एकजुटीनं ही लढाई उभी करेल. यांचे सर्व कारनामे जनतेपर्यंत पोहचवू, असा संकल्प घेऊन येणाऱ्या काही दिवसात आम्ही महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघणार आहोत, असंही नाना पटोले म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com