Nana Patole : आघाडीचा धर्म जो वरिष्ठ नेतेही पाळत नसतील तर कार्यकर्त्यांमध्ये रोष होणार स्वाभाविक आहे
लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यातच सांगली लोकसभेच्या जागेवरुन महाविकास आघाडीत अजूनही तिढा पाहायला मिळत आहे. यावर आता नाना पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधताना प्रतिक्रिया दिली आहे. नाना पटोले म्हणाले की, आम्ही हायकमांडला प्रस्ताव दिलेला आहे. ही जी आघाडीचा धर्म जो वरिष्ठ नेतेही पाळत नसतील तर कार्यकर्त्यांमध्ये रोष होणार स्वाभाविक आहे. बाकी या पद्धतीचे होता कामा नये. 2 जागेचा जो विषय होता.
विदर्भात आम्ही तुम्हाला कसंही सांभाळून घेतलं. विदर्भ हा वेगळा गड आहे. काँग्रेसचा गड राहिलेला आहे. पण पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण वेगळं आहे. याचा फरक ते समजायला तयार नसतील तर योग्य नाही. विदर्भामध्ये पहिल्या टप्प्यांमध्ये आम्ही जिंकूच. नेते समजायला तयारी नसतील तर हे बरोबर नाही.
यासोबतच नाना पटोले पुढे म्हणाले की, भाजपला हरवण्यासाठी आम्ही सर्व एकत्र आलो आहोत. या पद्धतीची भूमिका घेणं आणि या पद्धतीने उमेदवार जाहीर करणं स्वाभाविक आहे कार्यकर्त्यांमध्ये रोष होणार आहे. अजूनही वेळ गेलेला नाही आहे. त्यांनी अजूनही त्यावर विचार करावा. ही भूमिका आहे. आम्ही हायकमांडकडे हा सर्व प्रस्ताव पाठवलेला आहे. विदर्भातल्या दहाही जागा महाविकास आघाडी जिंकेल. या पद्धतीचे सगळीकडे वातावरण आहे. असे नाना पटोले म्हणाले.