Nana Patole on Badlapur Case : पटोलेंचे गंभीर आरोप! बदलापूरची 'ती' शाळा जिथे सुरु होतं ब्ल्यू फिल्म अन् अवयव विक्रीचे काम

Nana Patole on Badlapur Case : पटोलेंचे गंभीर आरोप! बदलापूरची 'ती' शाळा जिथे सुरु होतं ब्ल्यू फिल्म अन् अवयव विक्रीचे काम

बदलापूरच्या शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली. आता या प्रकरणात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी खळबळजनक दावा केला आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

बदलापूरच्या शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली. त्या प्रकरणानं संपूर्ण राज्यातील वातावरण ढवळून निघालं. आता या प्रकरणात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी खळबळजनक दावा केला आहे. त्यामुळे या प्रकरणाला पुन्हा एकदा नवं वळण मिळण्याची शक्यता आहे. बदलापूरच्या त्या शाळेत ब्ल्यू फिल्म बनवल्या जायच्या, असा दावा करुन पटोलेंनी खळबळ उडवून दिली आहे. ते नांदेडमध्ये एका जाहीर सभेत बोलत होते.महायुती सरकारच्या काळातील राज्यातील परिस्थितीवर भाष्य करताना पटोलेंनी बदलापूरमधील घटनेचा उल्लेख केला.

त्या शाळेत ब्ल्यू फिल्म तयार केल्या जायच्या, अवयव विक्रीचं काम चालायचं असा गंभीर आरोप पटोलेंनी केला. 'ही शाळा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहे. या शाळेत लहान मुलींच्या अश्लील चित्रफिती तयार करण्याचे, अवयवांची विक्री करण्याचे उद्योग सुरु होते,' असा आरोपी पटोलेंनी केला. ती शाळा आरएसएसशी संबंधित असल्यानंच सरकारनं या शाळेवर मेहेरबानी केली, असं पटोले पुढे म्हणाले.बदलापूरात चार-पाच वर्षांच्या मुलींवर अत्याचार झाले. दोनच नव्हे, तर असंख्य मुलींवर अत्याचार झाले.

न्यायालयानं चौकशीचे आदेशदेखील दिले. पण शाळा आरएसएसशी संबंधित असल्यानं राज्य सरकारनं त्यांच्या संचालक मंडळावर कारवाई केली नाही. माहितीच्या अधिकारातून एका व्यक्तीनं मागितली. त्या शाळेत ब्ल्यू फिल्म फिल्म, पिक्चर तयार करण्याचं, शरीराचे अवयव विकण्याशी संबंधित एक जनहित याचिका करण्यात आली आहे, असं पटोले नांदेडमधील भाषणात म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com