Nana Patole
Nana Patole

नाना पटोलेंचा राज्य सरकारवर गंभीर आरोप, पत्रकार परिषदेत म्हणाले; "शेतकऱ्यांच्या नावाने हजारो कोटी रुपये..."

हे सर्व प्रश्न आम्ही येणाऱ्या अधिवेशनात सभागृहात मांडू आणि सरकारकडे उत्तर मागू, असं म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य सरकारसह भाजपवर टीका केली आहे.
Published by :
Naresh Shende
Published on

Nana Patole Press Conference : राज्यातलं सरकार आखणं हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. महाराष्ट्रात आत्ता असलेली सत्ता हटवणं हे महत्त्वाचं काम आहे. शेतकरी रोज आत्महत्या करत आहेत. शेतकऱ्यांच्या नावाने हजारो कोटी रुपये खाण्याचं काम सरकार करत आहे. विकासाच्या नावाने राज्यातील सर्व संपत्ती गहाण ठेऊन बँकेतून कर्ज घेतलं जातं. त्यातून मोठ्या प्रमाणावर लूट केली जाते. राज्याच्या जनतेला कर्जात बुडवून भाजप आणि त्यांचे सहकारी जनतेच्या पैशाची लूट करत आहेत. हे सर्व प्रश्न आम्ही येणाऱ्या अधिवेशनात सभागृहात मांडू आणि सरकारकडे उत्तर मागू, असं म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य सरकारसह भाजपवर टीका केली आहे.

पत्रकार परिषदेत नाना पटोले पुढे म्हणाले, महाविकास आघाडी म्हणून एकत्रितपणे आम्ही या निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे. जागावाटपाचा विषय जुलैच्या पंधरवाड्यात किंवा शेवटच्या टप्प्यात संपला पाहिजे. ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. आम्हाला सत्ता मिळेल की नाही, हा इश्यू नाही. केंद्रातील मोदी सरकार खालच्या पातळीवर जाऊन काम करतं. ते कुणाच्या कुंटुंबाला तोडतील, पक्षाला तोडतील, परिवारात भांडण लावतील. हे चित्र आपण पाहत आहोत. अशा परिस्थितीत एकजूटच हा पर्याय आहे, असं आम्हाला वाटतं. भाजप सांगतोय, कुणी सांगतोय म्हणून आम्ही स्वबळावर लढायचं तसं नाही.

लोकसभेच्या ४८ जागांसाठी आम्ही संघटनेनं तयारी केली होती. त्याचा फायदा आमच्या मित्रपक्षालाही झाला. आम्हालाही त्याचा फायदा झाला. आमचं संघटात्मक काम सुरु राहिलं आहे. भाजपशी निगडीत जे लोक आहेत, तिथे ओबीसींची अवहेलना होणारच आहे. भाजपच्या सानिध्यात जी लोकं आली, मग तो ओबीसीचा चेहरा असेल, त्यांना टार्गेट केलं जातं. ओबीसी लोकांचा मतामध्ये वापर करता कसा येईल, यासाठी भाजप काम करतंय. छगन भुजबळांना त्रास होतोय, हे लपून राहिलं नाही. ते अडीच वर्ष जेलमध्ये राहिले होते. त्याच भुजबळांना आता त्यांनी सोबत घेतलं आहे. भाजपची ही गिरगीटसारखी पद्धत यातून स्पष्ट होतं, असंही नाना पटोले म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com