Nana Patekar : सरकारकडे मागू नका, कुठलं सरकार करायचं हे ठरवा

Nana Patekar : सरकारकडे मागू नका, कुठलं सरकार करायचं हे ठरवा

मोहाडी येथील सह्याद्री फार्म्स येथे सोमवारपासून दोन दिवसीय अखिल भारतीय शेतकरी साहित्य संमेलनास सुरुवात झाली.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

मोहाडी येथील सह्याद्री फार्म्स येथे सोमवारपासून दोन दिवसीय अखिल भारतीय शेतकरी साहित्य संमेलनास सुरुवात झाली. या कार्यक्रमात नाना पटोले बोलत होते. यावेळी नाना पटोले म्हणाले की, आई सांगायची सोने १६ रुपये तोळा होते. आता ते ५० हजार रुपयांवर पोहोचले. सोन्याचा भाव वाढला मग आमच्या गहू-तांदळाचा भाव का वाढत नाही. शेतीमालाला रास्तभाव हवा. पण प्रत्येक गोष्ट सरकारकडे मागून मिळत नाही. त्यामुळे सरकारकडे मागू नका, कुठलं सरकार करायचं हे ठरवा. मला राजकारणात जाता येत नाही, कारण जे पोटात ते ओठात येते, मला पक्षातून काढतील. कुठले आदर्श ठेवता आमच्या नव्या पिढीसमोर तुम्ही, काय चालले आहे.

नटसम्राट आज जर मला करायला सांगितले तर मी वेगळ्या पध्दतीने करेल. माझं नटसम्राटाचं दु:ख जे आहे ते चार भिंतीमधील आहे. गोंजारलेले दुःख आहे, आम्ही आमचं सर्व आयुष्यच आभाळाखाली ठेवलेले आहे. आमच्या पिकाला तिजोरी नसते.

कशाच्या आशेवर आम्ही जगायचे, रोज अन्न देणारा जो आहे त्याची तुम्हाला पत्रास नसेल तर मग आम्ही तुमची पत्रास का ठेवायची. शेतकरी कधीच अडवणूक करणार नाही. मला शेतकऱ्याचा जन्म नको असे शेतकरी कधीच म्हणणार नाही. जनावरांची भाषा आम्ही जाणतो, तुम्हाला आमची भाषा कळत नाही का? हे कधी संपणार. असे नाना पाटेकर म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com