Nana Patekar : जमलं तर त्या वाघनखांनी भ्रष्टाचाराचा कोथळा काढता आला तर पहा

Nana Patekar : जमलं तर त्या वाघनखांनी भ्रष्टाचाराचा कोथळा काढता आला तर पहा

छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे येत्या नोव्हेंबर महिन्यात लंडन येथून आणण्यात येणार आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे येत्या नोव्हेंबर महिन्यात लंडन येथून आणण्यात येणार आहेत. याची माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. छत्रपती शिवाजी महाराजांची लंडनमध्ये असलेली वाघ नखे या वर्षीच महाराष्ट्रात येणार आहे.  ब्रिटन सरकारकडून या संदर्भातील पत्र मिळाले  आहे. असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

अफजल खानाचा वध छत्रपती शिवाजी महाराज यांनी केला होता. वाघनखाच्या सहायाने महाराजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला होता. तिच वाघनखे भारतात आणून येथील जनतेच्या दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत.  ब्रिटनने वाघनखे आपणास देण्यास मान्यता दिली आहे. त्यासाठी ऑक्टोबर महिन्यात राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मनुगंटीवार इंग्लंडला जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं परत आणण्यासाठी इंग्लंडसोबत सामंजस्य करार करणार आहे. लंडनमधील विक्टोरिया एंड अल्बर्ट वस्तुसंग्रहालयात ही वाघनखं ठेवण्यात आली आहे. सगळ्या औपचारिकता वेळेत पूर्ण झाल्यास या डिसेंबरपूर्वीच वाघनखं महाराष्ट्रात आणली जाण्याची शक्यता आहे.

याच पार्श्वभूमीवर नाना पाटेकर यांनी ट्विट केलं आहे. नाना पाटेकर ट्विट करत म्हणाले की, मुनगंटीवार महाराजांची वाघनख आणताय त्या बद्दल अभिनंदन... जमल तर त्या वाघनखांनी भ्रष्टाचाराचा कोथळा काढता आला तर पहा.... असे नाना पाटेकर यांनी म्हटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com