बारामतीत आज नमो महारोजगार मेळावा पार पडणार आहे. या महारोजगार मेळाव्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत. बारामती येथे राज्य शासनाच्या वतीने नमो रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
बारामतीमध्ये होणाऱ्या नमो रोजगार मेळाव्याला शरद पवार उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे. मेळाव्याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
तसेच या कार्यक्रमासाठी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे उपस्थित राहणार आहेत.