हिवाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता; उद्धव ठाकरे - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमने-सामने येण्याची शक्यता
नागपूरमध्ये विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला उद्यापासून (9 डिसेंबर) सुरुवात होणार आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे एकमेकांसमोर येण्याची शक्यता आहे.उद्धव ठाकरे सुरुवातीचे दोन दिवस सभागृहाच्या कामकाजात सहभागी होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार या अधिवेशनासाठी उद्धव ठाकरे हे उद्या नागपुरात दाखल होणार आहेत.
हिवाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास विरोधी पक्षांची बैठक होणार आहे. त्यानंतर दोन वाजता विरोधी पक्षांची पत्रकार परिषद होईल. तसेच संध्याकाळी सहा वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद होणार आहे.
विविध मुद्यांवरुन हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे एकमेकांसमोर येण्याची शक्यता आहे.राज्यात सत्तांतर झाल्यानंतर नागपूरमध्ये पहिलंच हिवाळी अधिवेशन पार पडत आहे.