नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा प्रकरण; सुनील केदार यांना न्यायालयाचं समन्स

नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा प्रकरण; सुनील केदार यांना न्यायालयाचं समन्स

नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा प्रकरणी सुनील केदार यांना न्यायालयाकडून समन्स बजावण्यात आलं आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा प्रकरणी सुनील केदार यांना न्यायालयाकडून समन्स बजावण्यात आलं आहे. चौकशी अधिकारी जे एन पटेल यांनी सुनील केदार यांच्यासह संबधित पक्षकारांना समन्स बजावले आहेत.

नागपूरच्या रवी भवन येथील सभागृहात ही चौकशी होणार असून पक्षकांनी चौकशीत स्वतःची बाजू मांडावी आणि बचाव करिता आवश्यक कागदपत्रं सादर करावीच असे निर्देश देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

येत्या 14,15,16, 17 ऑक्टोंबरला स्वतः किंवा वकिलामार्फत चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पक्षकार अनुपस्थित राहिल्यास चौकशीची कारवाई त्यांच्याशिवाय पूर्ण केली जाईल ही चौकशी तहकूब केली जाणार नाही असे देखील सांगण्यात आले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com