राज्यात चिकनगुनियाचे सर्वाधिक रुग्ण नागपूर शहरात

राज्यात चिकनगुनियाचे सर्वाधिक रुग्ण नागपूर शहरात

राज्यात चिकनगुनियाचे सर्वाधिक रुग्ण नागपूर शहरात असल्याची माहिती मिळत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

ज्ञानेश्वर पवार, नागपूर

राज्यात चिकनगुनियाचे सर्वाधिक रुग्ण नागपूर शहरात असल्याची माहिती मिळत आहे. राज्यात 1 जानेवारी ते 7 सप्टेंबरपर्यंत 2 हजार 643 रुग्णाची नोंद झाली आहे यात नागपुर शहरात 574 रुग्णाची नोंद झाली आहे तर मुंबई शहरात 256 रुग्णाची नोंद झाली आहे.

यासोबतच मुंबई शहर हे दुसऱ्या क्रमांकावर असून आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे.

राज्यात 1 जानेवारी ते 7 सप्टेंबरपर्यंत 2 हजार 643 रुग्णाची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये नागपूर शहरात 574 रुग्णाची नोंद झाली असून मुंबई शहरात 256 रुग्णाची नोंद करण्यात आली आहे.

अमरावती 42, नाशिक 40, लातूर 27, कोल्हापूर 154, पुणे 151, अकोला 88, सांगली 84 तर पिंपरी चिंचवड मध्ये 22 रुग्ण आढळून आल्याची माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com