महापालिका निवडणुका पुन्हा लांबण्याची शक्यता
मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभागांची संख्या २२७ ठेवण्याचा राज्य सरकारचा निर्णय उच्च न्यायालयाने योग्य ठरवल्यामुळे आता पुन्हा एकदा प्रभागांसाठी आरक्षण सोडत काढावी लागणार आहे.
तसेच मतदारयाद्याही तयार करून हरकती-सूचना मागवाव्या लागणार आहेत. मात्र या निर्णयाला ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्यास महापालिकेची निवडणूक आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आता पुन्हा एकदा नव्याने- तिसऱ्यांदा आरक्षण सोडत काढावी लागणार असल्याची माहिती मिळत आहे. तसेच आतापर्यंत २३६ प्रभागांप्रमाणे मतदारयाद्या तयार करण्यात आल्या होत्या. त्या आता पुन्हा २२७ प्रभागांप्रमाणे कराव्या लागणार आहेत.
हरकती आणि सूचना मागवून सुनावणी घ्यावी लागणार असून त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेला वेळ लागण्याची शक्यता आहे . या न्यायालयीन लढाईत मुंबई महापालिकेला प्रतिवादी करण्यात आले नव्हते