Mumbai : मुंबईला दोन हजार मेगावॅट वीज मिळणार

Mumbai : मुंबईला दोन हजार मेगावॅट वीज मिळणार

मुंबईला दोन हजार मेगावॅट वीज मिळणार असल्याची माहिती मिळत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

मुंबईला दोन हजार मेगावॅट  वीज मिळणार असल्याची माहिती मिळत आहे. राजस्थानसह गुजरातमध्ये निर्माण होणारी हरित ऊर्जा नव्या वीज वाहिनीद्वारे मुंबईत आणली जाणार आहे.केंद्र आणि राज्य सरकारचा हा प्रकल्प असून, मुंबई ऊर्जा मार्ग प्रायव्हेट लिमिटेडकडून प्रकल्प उभारला जात आहे.

या निर्णयामुळे आता अतिरिक्त विजेचे दर कमी होण्यास मदत होणार आहे. मुंबई ऊर्जा मार्ग प्रायव्हेट लिमिटेडकडून पडघा-पनवेल पॉवर ट्रान्समिशन कॉरिडॉर प्रकल्प उभारला जात आहे. या पडघा-पनवेल पॉवर ट्रान्समिशन कॉरिडॉर प्रकल्पाचे येत्या काही दिवसांतच लोकार्पण होणार आहे.

याद्वारे अतिरिक्त २ हजार मेगावॅट वीज वाहून आणली जाणार आहे. यामुळे अतिरिक्त विजेचे दर कमी होण्यास मदत होणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com