Mumbai Sagwan Send Delhi: पंतप्रधानांच्या खुर्चीसाठी चंद्रपुरातील सागवान वापरणार
सर्वाधिक जंगल आणि प्राणी ज्या राज्यात आढळतात ते ठिकाण म्हणजे चंद्रपूर. राम मंदिरपासून ते संसद भवनासाठी चंद्रपूरातील सागवान वापरण्यात आले आणि आता हेच सागवान पंतप्रधानांच्या खुर्चीसाठी देखील वापरण्यात येणार आहेत. महाराष्ट्रासाठी ही एक अभिमानास्पद गोष्ट असून महाराष्ट्रासाठी कौतूकाची देखील बाब आहे.
आता दिल्लीचे तख्त ही महाराष्ट्र बनवणार असल्याचं समोर आलं आहे. राम मंदिर, संसद भवनानंतर आता पंतप्रधानांच्या खुर्चीच्या रुपात महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. पंतप्रधानांच्या खुर्चीसाठी आता चंद्रपुरातील सागवान वापरण्यात येणार आहेत. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही माहिती दिली आहे. तर रविवारपासून चंद्रपुरातून दिल्लीला सागवान पाठवले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
तर पंतप्रधान कार्यालय, केंद्रीय मंत्रिमंडळ सभागृह, केंद्रीय मुख्य सचिवांचे दालन तयार करण्यासाठी चंद्रपुरातील सागवान वापरले जाणार आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील सागवानामध्ये रिंग आणि ग्रेन पॅटर्न आढळतो, जो देशात सर्वाधिक सुंदर आहे. त्यामुळे चंद्रपुरातील सागवानाची निवड राम मंदिर, संसद भवन आणि आता पंतप्रधानांच्या खुर्चीसाठी करण्यात आली आहे. देशात सर्वोच्च सागवान चंद्रपुरात असल्याने येथील लाकडापासून पंतप्रधानांची खुर्ची तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता दिल्लीचे ही तख्त महाराष्ट्र राखणार असं समोर येत आहे.