मुंबई-पुणे प्रवास होणार अधिक वेगवान; ठाणे खाडी पूल 3 प्रकल्पांतील दक्षिणेकडील मार्गिका लवकरच सेवेत

मुंबई-पुणे प्रवास होणार अधिक वेगवान; ठाणे खाडी पूल 3 प्रकल्पांतील दक्षिणेकडील मार्गिका लवकरच सेवेत

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) हाती घेतलेल्या ठाणे खाडी पूल-3 प्रकल्पातील दक्षिणेकडील अर्थात मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेचे काम पूर्ण झाले आहे.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) हाती घेतलेल्या ठाणे खाडी पूल-3 प्रकल्पातील दक्षिणेकडील अर्थात मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेचे काम पूर्ण झाले आहे. आता विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी होण्यापूर्वी ही मार्गिका वाहतूक सेवेत दाखल करण्याचा निर्णय एमएसआरडीसीने घेतला आहे. 2020 पासून कामास सुरुवात झाली असून 559 कोटी रुपये खर्च (निविदेनुसार) (मूळ खर्च 775.57 कोटी रु.) पुलासाठी 1.837 खर्च झाले आहेत.

सप्टेंबरअखेरीस ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात ही मार्गिका वाहतुकीसाठी खुली होणार आहे. ही मार्गिका वाहतुकीस खुली झाल्यास मुंबईहून पुण्याकडे जाण्यासाठी खाडीपूल-2 सह नवीन ठाणे खाडी पूल-3 चा पर्याय उपलब्ध होणार आहे. त्यामुळे मुंबई - पुणे प्रवास वाहतूक कोंडीमुक्त, वेगवान होणार आहे. मुंबई - पुणे प्रवासासाठी सध्या दोन खाडीपूल सेवेत आहेत. ठाणे खाडी पूल-2 वरील वाहनांचा वाढता भार कमी करण्यासाठी ठाणे खाडी पूल-3 प्रकल्प हाती 2015 मध्ये खाडी पूल-3 उभारण्याचा निर्णय 24 नोव्हेंबर 2017 मध्ये प्रकल्पास राज्य सरकारची मंजुरी मिळाली होती.

या पार्श्वभूमीवर एमएसआरडीसीने ठाणे खाडी पूल-3 प्रकल्प हाती घेतला आहे. हा प्रकल्प आतापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र तांत्रिक अडचणींमुळे प्रकल्प लांबणीवर पडला आहे. आता मात्र या प्रकल्पाने वेग घेतला आहे. या प्रकल्पातील दक्षिणेकडील मार्गिकेचे अर्थात मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गिकेचे काम पूर्ण झाल्याची माहिती एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. येत्या 15 दिवसांत ही मार्गिका वाहतूक सेवेत दाखल होईल, असेही त्यांनी सांगितले.

मुंबई-पुणे प्रवास होणार अधिक वेगवान; ठाणे खाडी पूल 3 प्रकल्पांतील दक्षिणेकडील मार्गिका लवकरच सेवेत
मोबाईल इंटरनेटवर सरकारचा मोठा निर्णय! साडेतीन तास इंटरनेट बंद, कायदा काय म्हणतो?
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com