मुंबईकरांनो आरोग्याची काळजी घ्या! मुंबईतील हवेचा दर्जा खालावला; अशाप्रकारे घ्या काळजी
वातावरणातील घातक धूलीकणांचे प्रमाण वाढले आहे. दोन्ही बाजूंनी समान वारे वाहत असल्याने मुंबई आणि नवी मुंबईला प्रदुषणाचा विळखा बसलेला आहे. अतिधोकादायक हवेची नोंद झाली असून हवा गुणवत्ता निर्देशांक 318 नोंदवला गेला आहे. ऑक्टोबर ते मार्च या महिन्यांच्या दरम्यान हवेची गुणवत्ता खालावत आहे.
मुंबई, नवी मुंबईला प्रदुषणाचा विळखा बसला आहे. मुंबई शहरात धुलीकणांच्या प्रमाणाने अतिधोकादायक पातळी ओलांडली आहे. शहरातील हवेचा दर्जा काही दिवसांपासून वाईट श्रेणीत नोंदला जात असल्याची माहिती मिळते आहे. मुंबईकरांना काळजी घ्यावी लागणार आहे.
वाढत्या प्रदूषणामुळे हवेत धूळ उडण्याचं प्रमाणही वाढलेलं आहे. वाऱ्यांचा वेग मंदावला असून मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावली आहे.
अशाप्रकारे घ्या काळजी
सकाळी घराबाहेर पडू नका.
रोज सकाळी योगा करा.
मास्क लावूनच घराबाहेर पडा
श्वास घेण्यास त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.