ताज्या बातम्या
मुंबईमधील 803 मशिदींवरील भोंग्यांना परवानगी
या सर्व मशिदींना नियमांचे पालन करून भोंगे वाजविण्याची परवानगी देण्यात आली आहे.
मागील अनेक दिवसांत राज्यातील राजकारण (Maharashtra Politics) हे मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरून ढवळून निघालं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंगे न उतरविल्यास आक्रमक होत मशिदींसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा वाजविण्याची भुमिका घेतल्यानंतर राज्यभरातील वातावरण हे अस्थिर झालं आहे. त्यातच आता मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) मुंबईतील मशिदींना भोंगा लावण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.
मुंबईमधील 1144 पैकी 803 भोंग्यांना मुंबई पोलिसांनी परवानगी दिली आहे. या सर्व मशिदींना नियमांचे पालन करून भोंगे वाजविण्याची परवानगी देण्यात आली आहे. आता पोलिसांच्या ह्या निर्ण्यावर मनसे काय भुमिका घेणार हे पाहणं गरजेचं आहे.