Mumbai Measles Disease
Mumbai Measles DiseaseTeam Lokshahi

Measles Disease : गोवरचा उद्रेक आटोक्यात आणण्यासाठी मुंबई पालिका अॅक्शन मोडमध्ये

गोवरचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. यामध्ये काही बालकं दगावली आहेत. येत्या काळात देशाच्या आर्थिक राजधानीवरचं गोवरचं संकट आणखी गडद होण्याची भीती निर्माण झाली आहे.
Published by :
Pankaj Prabhakar Rane
Published on

मुंबई : महानगरात गोवरचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. यामध्ये काही बालकं दगावली आहेत. येत्या काळात देशाच्या आर्थिक राजधानीवरचं गोवरचं संकट आणखी गडद होण्याची भीती निर्माण झाली आहे. मुंबईकरांनी सतर्क राहून काळजी घेण्याचं आवाहन महापालिकेच्यावतीनं करण्यात आलंय. गोवरचा उद्रेक आटोक्यात आणण्यासाठी मुंबई महापालिकेकडून कंबर कसली आहे. ठिकठिकाणी लसीकरणाचे कॅम्प्स सुरु आहेत. काही प्रमाणात लसीकरणाविषयीची उदासीनता आणि विरोध देखील दिसून येतो, अशावेळी मौलवींची मदत घेत नागरिकांना आवाहन देखील करण्यात येत आहे.

याबाबत एका आरोग्य अधिकाऱ्यानं सांगितलं की, गोवरचे रुग्ण वाढत आहेत. मात्र आम्ही उपाययोजना देखील करत आहोत. गोवर रुग्णांचा आढावा घेतला असता 40-50 टक्के 1-4 वर्षातील मुलांना गोवरची लागण झाली आहे. 4-9 वर्ष वयोगटातील 70-80 टक्के मुलांना गोवरची लागण झाल्याचं त्यांनी सांगितलं.

गोवर गंभीर होऊ शकतो ज्यात निमोनियासारखा आजार देखील बळावत रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे लसीकरण करुन घ्या, असंही त्यांनी सांगितलं. संशयित रुग्णांच्या संख्येत 50 टक्के मुलांनी लस घेतलेली नाही. ताप आणि पुरळ असलेल्यांना त्वरीत संपर्क करण्यास सांगितलं आहे. शिवाय उपचारासाठी अतिरिक्त वॉर्डची व्यवस्था देखील केली आहे. शिवाजी नगर रुग्णालय किंवा शताब्दी रुग्णालय सोबतच पश्चिम उपनगरीय भागातही उपचारासाठी वॉर्डची उभारणी केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com