BMC Election : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आज सोडत, ओबीसी, सर्वसाधारण महिलांसाठीही नव्याने सोडत

BMC Election : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आज सोडत, ओबीसी, सर्वसाधारण महिलांसाठीही नव्याने सोडत

मुंबई महापालिका निवडणुकीकरता आरक्षण सोडत आज जाहीर होणार आहे. न्यायालयानं यापूर्वी दिलेल्या आदेशानुसार ओबीसी आरक्षणासह प्रभाग आरक्षण सोडत जाहीर होणार आहे.
Published by :
Shweta Chavan-Zagade
Published on

मुंबई महापालिका निवडणुकीकरता (Mumbai Municipal Elections) आरक्षण सोडत आज जाहीर होणार आहे. न्यायालयानं यापूर्वी दिलेल्या आदेशानुसार ओबीसी आरक्षणासह प्रभाग आरक्षण सोडत जाहीर होणार आहे. हा कार्यक्रम सकाळी 11 वाजता बालगंधर्व रंगमंदीर बांद्रा या ठिकाणी होणार आहे. मुंबई महापालिकेत 9 वॉर्डस वाढले आहेत. यामुळे यावेळी मुंबई महापालिकेत 63 जागांवर ओबीसी आरक्षण जाहीर होणार आहे. यंदाच्या सोडतीतही गेल्या तीन निवडणुकीतील पुरुष ओबीसी आरक्षण जाहीर झालेल्या प्रभागात महिला आरक्षण जाहीर करण्यासाठी प्राधान्यक्रम ठरवला जाणार आहे.

BMC Election : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आज सोडत, ओबीसी, सर्वसाधारण महिलांसाठीही नव्याने सोडत
Ajit Pawar | "आम्हाला प्रतिप्रश्न करण्यापेक्षा ठोस कार्यवाही करा"; फडणवीसांना अजित पवारांचं उत्तर

दरम्यान अनुसूचित जाती, अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती आणि अुसूचित जमाती महिला यांच्या सोडतीमध्ये कोणताही बदल होणार नाही. त्यांचे आरक्षण हे लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाने होत असल्याने आणि यांच्यासाठी जागा राखून ठेवल्यामुळे त्यांच्या आरक्षणात कोणाताही बदल होणार नाही. त्यामुळे त्यांचे आरक्षण हे ३१ मे २०२२ रोजी काढलेल्या सोडतीनुसारच कायम राहणार आहे.

मुंबई महापालिका लोकसंख्या, जागा आणि प्रभाग

एकूण लोकसंख्या – १ कोटी २४ लाख ४२, ३७३

एस. सी. – ८ लाख ३ हजार २३६

एस. टी. – १ लाख २९ हजार ६५३

--------------------------------------------------------------

एकूण जागा – २३६

महिला आरक्षित – ११८

---------------------------------------------------

एकूण जनरल जागा – १५६

जनरल महिला जागा – ७७

-------------------------------------------------------

एकूण ओबीसी जागा – ६३

ओबीसी महिला जागा – ३२

एकूण एस. सी. जागा – १५

एस. सी. महिला जागा – ८

----------------------------------------------

एकूण एस. टी. जागा – २

एस. टी. महिला जागा – १

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com