Mumbai Metro: आता महामुंबई मेट्रोसाठी नवी सेवा उपलब्ध!  व्हॉट्सअॅपद्वारे करता येणार बुकिंग; कशी ते जाणून घ्या...

Mumbai Metro: आता महामुंबई मेट्रोसाठी नवी सेवा उपलब्ध! व्हॉट्सअॅपद्वारे करता येणार बुकिंग; कशी ते जाणून घ्या...

मेट्रो 2 अ, 7 मार्गिकेवर नवी सेवा उपलब्ध होणार आहे. प्रवाशांच्या सोयीत नवी भर देण्यात आलेली आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

मेट्रो 2 अ, 7 मार्गिकेवर नवी सेवा उपलब्ध होणार आहे. अंधेरी पश्चिमपासून दहिसर मेट्रो २ अ तसेच गुंदवली ते दहिसर त्याचसोबत गुदवला मेट्रो ७ या मार्गिकेवर प्रवाशांच्या सोयीत नवी भर देण्यात आलेली आहे. मेट्रोच्या तिकीटाची सेवा आता व्हॉट्सअॅपद्वारे बुकिंग करता येणार आहे. महामुंबई मेट्रोकडून व्हॉट्सअॅपद्वारे ई तिकीट वितरित करण्याची प्रणाली सुरू करण्यात आलेली आहे. यामुळे प्रवाशांना मात्र तिकिटांसाठी रांगेत उभे राहावे लागणार नाही.

तर आता पेपर तिकीटांचे प्रमाण कमी होताना पाहायला मिळणार आहे. यामुळे फायद्याची गोष्ट अशी आहे की, आता पेपर तिकीट हरवण्याची भीती आता प्रवाशांच्या मनात कमी होणार आहे. हे महामुंबई मेट्रोकडून सुरू करण्यात आलेल्या या व्हॉट्सअॅपद्वारे ई तिकीट वितरित करण्याच्या प्रणालीत व्हॉट्सअॅपद्वारे बुकिंग कशी करायची ते जाणून घ्या...

व्हॉट्सअॅप ई तिकीट बुकिंग:

प्रवाशांना एमएमएमओसीएलने दिलेल्या ८६५२६३५५०० या क्रमांकावर इंग्रजीत 'हाय' टाइप करून पाठवावे लागेल.

त्यानंतर व्हॉट्सअॅपवर काही सुचना दिल्या जातील त्या आलेल्या सूचनांनुसार कोठून कुठे जायचे आहे त्या ठिकाणाचे नाव नोंदवावे लागेल.

त्यानंतर तिकिटांची संख्या सांगावी लागेल.

त्यानुसार यूपीआय, क्रेडिट, नेटबँकिंग किंवा डेबिट कार्डद्वारे पैसे दिल्याने लिंक मिळेल. यावरील क्यूआर कोड स्कॅन करताच प्रवाशांना स्थानकात प्रवेश मिळेल.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com