Crime News | mulund suicide case
Crime News | mulund suicide caseTeam Lokshahi

Crime News : म्हणून तरूणाने केली आईची हत्या, पोलिसांनी...

आईच्या अंगावर चाकूच्या 11 जखमा आढळल्या
Published by :
Shubham Tate
Published on

mulund suicide case : मुंबईच्या मुलुंड परिसरात अभियांत्रिकी शाखेचा विद्यार्थी जयदीप पांचाळ याने शनिवारी आपल्या आईची हत्या केल्यानंतर स्वतःचा जीव देण्याचा प्रयत्न केला. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जयदीपने स्वयंपाकघरातील पंख्याला गळफास घेण्याचा प्रयत्न केला, पण तो अयशस्वी झाला. दरम्यान, आवाजाची विचारपूस करण्यासाठी त्याची आई आली, यावरून भांडण झाले. दरम्यान, जयदीपने स्वयंपाकघरातील चाकू उचलून आईवर वार केले. (mumbai man killed his mother for stopping him committing suicide in mulund)

यानंतर जयदीपने आंघोळ करून रेल्वे स्टेशनवर जाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा पोलिसांचा संशय आहे. याची अधिक माहिती घेण्यासाठी पोलीस आता बेशुद्ध अवस्थेत असलेल्या जयदीपला पुन्हा शुद्धीत येण्याची वाट पाहत आहेत.

Crime News | mulund suicide case
Oppo चा नवा स्मार्टफोन लॉन्च, मिळणार 12 GB रॅम आणि लेटेस्ट प्रोसेसर

आईच्या अंगावर चाकूच्या 11 जखमा आढळल्या

ही घटना शनिवारी घडली. छाया यांचा मृतदेह त्यांच्या घरात 11 चाकूच्या जखमांसह आडळला होता, तर जयदीपने मुलुंड स्थानकावर ट्रेनसमोर उडी मारली होती. सध्या त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुलुंड पोलिस ठाण्यातील एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, "आम्ही छायाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवला आहे आणि खून कसा झाला हे जाणून घेण्यासाठी पुन्हा पांचाळ कुटुंबीयांची भेट घेतली."

Crime News | mulund suicide case
Viral Video : लाइव्ह रिपोर्टिंगदरम्यान महिला पत्रकाराने मुलाला मारली मुस्काडीत

याबाबत आम्हाला संशय असल्याचे पोलिसांनी सांगितले

पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आम्हाला संशय आल्यानुसार जयदीपने आधी किचनमध्ये जाऊन दुपट्ट्याचा वापर करून पंख्याला लटकण्याचा प्रयत्न केला. पंख्याचे ब्लेड वजनामुळे वाकल्याचे आम्हाला आढळले आणि आम्हाला खात्री आहे की, त्याचा प्रयत्न अयशस्वी झाला. त्यावेळी घरी असलेल्या त्याच्या आईला ही बाब समजली आणि त्यांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे हाणामारी झाली. जयदीपने पुन्हा चाकू उचलून आईला भोसकले. यानंतर त्याने आपले कपडे धुतले आणि नंतर मुलुंड स्थानकाकडे आत्महत्येसाठी निघून गेल्याचा आम्हाला संशय आहे.

मुलुंड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कांतीलाल कोथंबिरे यांनी सांगितले की, प्राथमिक तपासानंतर आम्हाला संशय आहे की जयदीपला आत्महत्या करायची होती आणि त्याच्या आईने त्याला रोखले त्यामुळे तिने त्याची हत्या केली. तो शुद्धीवर येण्याची आपण वाट पाहत आहोत. त्यानंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होईल.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com