Vande Bharat Express: ओडिशा रेल्वे अपघाताच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा 'वंदे भारत एक्स्प्रेस'चा उद्घाटन कार्यक्रम रद्द

बालासोर जिल्ह्यातील बहनगा रेल्वे स्थानकाजवळ कोरोमंडल एक्सप्रेस ट्रेन रुळावरून घसरल्याने भीषण अपघात झाला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

बालासोर जिल्ह्यातील बहनगा रेल्वे स्थानकाजवळ कोरोमंडल एक्सप्रेस ट्रेन रुळावरून घसरल्याने भीषण अपघात झाला आहे.

याच पार्श्वभूमीवर आता मुंबई-मडगाव (Mumbai Goa Vande Bharat Express) दरम्यान धावणाऱ्या 'वंदे भारत एक्स्प्रेस'चा (Vande Bharat Express) आज (3जूनला) होणारा उद्घाटन कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गोव्याची पहिली वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार होता. अपघातामुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आली आहे. ओडिशामध्ये झालेल्या रेल्वे अपघाताच्या (Odisha Railway Accident) पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

Vande Bharat Express: ओडिशा रेल्वे अपघाताच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा 'वंदे भारत एक्स्प्रेस'चा उद्घाटन कार्यक्रम रद्द
Odisha Train Accident: ओडिशात कोरोमंडल एक्सप्रेस ट्रेनचा भीषण अपघात; 233 प्रवाशांचा मृत्यू, 900 जण जखमी
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com