जम्बोब्लॉक काळात एसटी, बेस्टकडून जादा गाड्यांची सोय

जम्बोब्लॉक काळात एसटी, बेस्टकडून जादा गाड्यांची सोय

मध्य रेल्वेवर आजपासून 3 दिवस जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

मध्य रेल्वेवर आजपासून 3 दिवस जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे. सीएसएमटी आणि ठाण्यातील फलाटाच्या कामासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. सीएसएमटी स्थानकातील फलाटाच्या विस्तारीकरणासाठी मध्य रेल्वेकडून 36 तासांचा ब्लॉक घेण्यात आला आहे. तर ठाण्यातील फलाटाच्या कामासाठी ब्लॉक 63 तासांचा ब्लॉक घेण्यात आला आहे.

याच पार्श्वभूमीवर आता जम्बोब्लॉक काळात एसटी, बेस्टकडून जादा गाड्यांची सोय करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. एसटीकडून मुंबईतून ठाण्यासाठी 50 जादा गाड्यांची सोय करण्यात आली आहे.

बेस्टकडून ब्लॉक काळात 486 जादा गाड्या चालवल्या जाणार आहे. कुलाबा, धारावी, बॅकबे, प्रतीक्षानगर, वडाळा, मुंबई सेंट्रल आगारातून अतिरिक्त गाड्यांची सोय केली गेली असून कुर्ला, नेहरूनगर, परळ आणि दादर स्थानकातून ठाण्यासाठी जादा गाडा चालवल्या जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com