ताज्या बातम्या
मुंबई हायकोर्टाचा बार मालकांना मोठा दिलासा; मुंबईत 4 जूनला दारु विक्रीला परवानगी
मुंबई हायकोर्टने बार मालकांना मोठा दिलासा दिला आहे.
मुंबई हायकोर्टने बार मालकांना मोठा दिलासा दिला आहे. मुंबईत 4 जूनला दारु विक्रीला परवानगी देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मतमोजणीच्या दिवशीचा ड्राय डे रद्द करण्याच्या याचिकेवर निर्णय घेण्यात आला आहे.
आहार संघटनेकडून याबाबत याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी पार पडली असून मुंबई हायकोर्टाकडून निर्णय देण्यात आला आहे. त्यामुळे आता बार मालकांमध्ये आनंदाचं वातावरण वातावरण आहे.