मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमनच्या कबरीला व्हीआयपी ट्रीटमेंट

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमनच्या कबरीला व्हीआयपी ट्रीटमेंट

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमनच्या कबरीला व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याची माहिती मिळत आहे. कबरीवर मार्बल आणि LED लाईट्स लावण्यात आल्या आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमनच्या कबरीला व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याची माहिती मिळत आहे. कबरीवर मार्बल आणि LED लाईट्स लावण्यात आल्या आहेत. 1993च्या बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमनच्या कबरीवर मार्बल आणि LED लाईट्स लावण्यात आल्या आहेत. कबरीच्या ओट्याला एकंदरीत संगमरवरी बसवले आहे. LED दिवे लावले आहेत जे रात्रीच्या मुख्यतः मेमनची कबर प्रकाश झोतात राहिल या अनुशंगाने लावलेले दिसतात.

स्मशानभूमी विश्वस्तांकडून कोपऱ्यात स्विच बोर्ड लावून वीजपुरवठा केला जातो. कबरीची जमीन विकली नाही तर फाशी दिलेल्या आरोपीच्या कबरिला इतकी व्हीआयपी वागणूक का? दिली जात आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या पार्श्वभूमीवर आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

मेमनला नागपूर मध्यवर्ती कारागृहात फाशी दिल्यानंतर 30 जुलै 2015 रोजी दक्षिण मुंबईतील मरीन लाइन्स बडा कब्रस्तान येथे दफन करण्यात आले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com