मुंबईतील हवेची गुणवत्ता पातळी खालावली
गेल्या काही दिवसांपासून मुंबईत हवेची पातळी खराब होत चालली आहे. प्रदूषणात वाढ झालेली पाहायला मिळत आहे. मुंबईतील हवेची पातळी ही खालावली आहे मुंबईत मोठ्या प्रमाणात हवा प्रदूषित झालेली आहे कोर्टाचे आदेश धाब्यावर बसवत मुंबईकरांनी मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी केली आणि याचाच परिणाम आज निसर्गावर दिसत आहे. मुंबईत काही प्रमाणात हवा प्रदूषण वाढल आहे सल्फर डाय ऑक्साईडचे प्रमाण सुद्धा वाढलेला आहे यामुळे मुंबईतील हवेची पातळी ही खालावली असून सध्याची परिस्थिती चिंताजनक आहे. मुंबईतील हवेची गुणवत्ता पातळी 288 वर जाऊन पोहोचली आहे. दिवाळीनिमित्त जोरदार फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
फटाके फोडण्यासाठी रात्री 8 ते 10 ची वेळ देण्यात आली आहे मात्र संध्याकाळपासून फटाके फोडण्यास सुरुवात करण्यात आली. त्यामुळे हवेची गुणवत्ता आणखी खालावली आहे.
मुंबईतील हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस ढासळत असल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाकडून बांधकामे स्थगित करण्यासाठीचे निर्देश देण्यात आले होते. याच्याआधी धुलिकणांचं प्रमाण कमी झाल्याने हवेची पातळी सुधारली होती मात्र आता दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फटाक्यांमुळे हवेची पातळी पुन्हा खालावल्याचे पाहायला मिळत आहे.