Mumbai Local : मुंबईकरांचा प्रवास होणार गारेगार
राज्यात उष्णतेची (summer) लाट वाढत असून मुंबईकर देखील उन्हाळ्यातील उकाड्याने हैराण झाले आहेत. दरम्यान मुंबईची (Mumbai) लाईफ लाईन समजल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खूशखबर आहे. मुंबईच्या एसी लोकल रेल्वेच्या तिकीटाच्या दरामध्ये मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. तिकीटांच्या दरामध्ये ५० टक्के घट करण्याची घोषणा मंत्री रावसाहेब दानवे यांनी केली आहे. तसेच सिंगल तिकीटमध्ये देखील ५० टक्के घट करण्यात येणार असून भाडे फक्त ३० रुपये असणार आहे.
रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (raosaheb danve) आज मुंबईत एका कार्यक्रमानिमित्त भायखळा रेल्वे स्थानकाला भेट दिली. याच कार्यक्रमात एसी लोकलचे तिकीट दर कमी करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
मध्य रेल्वेकडून (centrail railway) ५ हजार प्रवाशांचं सर्वेक्षण करण्यात आलं होतं. त्यात एसी लोकलबाबत प्रवाशांना प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी ९८ टक्के प्रवाशांनी एसी लोकलचं तिकीट कमी करण्याची मागणी केली होती. त्याचबरोबर एसी लोकलच्या फेऱ्या वाढविण्यात येण्याची मागणी ९५ टक्के प्रवाशांनी केली, अशी माहिती मध्य रेल्वेच्या वाणिज्य विभागाकडून देण्यात आली होती. आता याच सर्व मागण्यांचा मागावो घेत रेल्वे प्रशासनाकडून तिकटी दरात कपात करण्यात आली आहे.