Mukesh ambani
Mukesh ambaniTeam Lokshahi

मुकेश अंबानींनी घेतले तिरुपती बालाजीचे दर्शन, दिली एवढ्या कोटींची देणगी

देशातील सर्वात मोठे उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी शुक्रवारी आंध्र प्रदेशातील तिरुपती येथे भगवान व्यंकटेश्वराचे दर्शन घेतले.
Published by :
shweta walge
Published on

देशातील सर्वात मोठे उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी शुक्रवारी आंध्र प्रदेशातील तिरुपती येथे भगवान व्यंकटेश्वराचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या वतीने तिरुमला तिरुपती देवस्थानम या मंदिर ट्रस्टला दीड कोटी रुपयांची देणगी देण्यात आली.

लहान मुलगा अनंत अंबानी यांची मंगेतर राधिका मर्चंटही त्यांच्यासोबत भगवान व्यंकटेश्वराच्या दर्शनासाठी पोहोचली होती. मुकेश अंबानींने या मंदिराच्या प्रांगणात उपस्थित हत्तीला भोजनही दिले आणि आशीर्वादही घेतला.

1.5 कोटी दान केले

मुकेश अंबानींसोबत रिलायन्स रिटेल लिमिटेडचे ​​संचालक मनोज मोदीही होते. अंबानींनी मंदिर ट्रस्टला दीड कोटी रुपयांची देणगी दिली. यावेळी ते म्हणाले की, मी तिरुमला येथे भगवान व्यंकटेश्वराचे दर्शन घेण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे.

यासोबत ते पुढे म्हणाले की, मंदिर वर्षानुवर्षे चांगले होत आहे आणि सर्व भारतीयांना याचा अभिमान आहे.

अंबानी कुटुंब हे अतिशय धार्मिक मानले जाते. याआधी अंबानी कुटुंबाने सोमवारी राजस्थानमधील राजसमंद जिल्ह्यातील नाथद्वारा येथील श्रीनाथजी मंदिरातही दर्शन घेतले होते.

Mukesh ambani
गौतम अदाणीच्या कंपन्या कर्जबाजारी ? जाणून घ्या सविस्तर माहिती...
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com