MS Dhoni IPL 2024 Record
MS Dhoni IPL 2024 Record

IPL 2024: थाला मॅजिक! ४२ वर्षांच्या धोनीनं एबी डिव्हिलियर्सचा मोडला विक्रम, 'या' खास लिस्टमध्ये कोरलं नाव

मैदानात अष्टपैलू कामगिरी करुन भल्या भल्या प्रतिस्पर्धी संघांना पराभवाची धूळ चारणारा महेंद्र सिंग धोनी पुन्हा प्रकाशझोतात आला आहे.
Published by :
Naresh Shende
Published on

जागतिक क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधार म्हणजे महेंद्र सिंग धोनी, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण मैदानात अष्टपैलू कामगिरी करुन भल्या भल्या प्रतिस्पर्धी संघांना पराभवाची धूळ चारणारा महेंद्र सिंग धोनी पुन्हा प्रकाशझोतात आला आहे. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात धोनी चौकार-षटकारांचा पाऊस पाडत आहे. इकाना स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात धोनीनं ९ चेंडूत २८ धावा कुटल्या. धोनीनं चेन्नईसाठी धडाकेबाज फलंदाजी केली, पण लखनऊ सुपर जायंट्सने चेन्नईचा पराभव केला.

धोनीनं मोडला एबी डिव्हिलियर्सचा विक्रम

लखनऊ विरोधात आयपीएलमध्ये सर्वात जास्त धावा करणाऱ्या फलंदाजांच्या शर्यतीत धोनी सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. धोनीनं २५७ सामन्यांमध्ये ५१६९ धावा कुटल्या आहेत. तर डिव्हिलियर्सने आयपीएलमध्ये एकूण ५१६२ धावा करण्याचा कारनामा केला आहे. धोनीच्या विक्रमामुळे डिव्हिलियर्स आता सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे. आयपीएलमध्ये सर्वात जास्त धावा करणाऱ्या टॉप फाईव्ह फलंदाजांमध्ये विराट कोहली पहिल्या क्रमांकावर आहे. विराटने २४४ सामन्यांमध्ये ७६२४ धावा केल्या आहेत. तर कोहलीनंतर या लिस्टमध्ये शिखर धवन, डेव्हिड वॉर्नर, रोहित शर्मा आणि धोनीचा समावेश आहे.

आयपीएलच्या इतिहासात सर्वात जास्त धावा करणारे फलंदाज

विराट कोहली - ७६२४

शिखर धवन - ६७६९

डेव्हिड वॉर्नर - ६५६३

रोहित शर्मा - ६५०८

सुरेश रैना - ५५२८

एम एस धोनी - ५१६९

चेन्नईने लखनऊ सुपर जायंट्सला १७७ धावांचं आव्हान दिलं होतं. त्यानंतर मैदानात उतरलेल्या लखनऊनं १८० धावा करत चेन्नईचा पराभव केला. के एल राहुलने ८४ तर डिकॉकने ५४ धावांची खेळी केली. लखनऊने सात सामन्यांपैकी चार सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. लखनऊच्या संघाला ८, तर चेन्नईच्या संघानेही सात सामन्यांमध्ये ८ गुण मिळवले आहेत. चेन्नईचा नेट रन रेट चांगला असल्यानं गुणतालिकेत ते तिसऱ्या स्थानावर आहेत. तर लखनऊचा संघ पाचव्या क्रमांकावर आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com