MPSC ची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय; नवीन तारीख कोणती?
महाराष्ट्रात 25 ऑगस्ट रोजी होणारी एमपीएससी पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्याच्या मागणीसाठी पुण्यात आंदोलन करणाऱ्या उमेदवारांची राष्ट्रवादी-सपा अध्यक्ष शरद पवार यांनी पाठिंबा दर्शविला होता. त्यांनी आपली भूमिका स्पष्ट न केल्यास आपण आंदोलनात सहभागी होऊ, असा इशाराही त्यांनी महाराष्ट्र सरकारला दिला. गेल्या दोन दिवसांत पुण्यात स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी आंदोलन करत होते. त्यामध्ये त्यांच्या अनेक मागण्या होत्या. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची आज सकाळी 10 वाजता बैठक झाली. यामध्ये परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.
यावेळी आयोग म्हणाले, 'आज रोजी आयोजित आयोगाच्या बैठकीमध्ये रविवार, दि. 25 ऑगस्ट 2024 रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. परीक्षेचा दिनांक लवकरात लवकर जाहिर करण्यात येईल.'
या संदर्भात राष्ट्रवादीचे युवा नेते रोहीत पवार यांनी आंदोलन स्थळी तळ ठोकला होता. येथील विद्यार्थ्यांची संख्या 30 हजार झाल्याचे रोहीत पवार यांनी म्हटले होते. आज राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी आज आंदोलन स्थळाला भेट देणार असे ट्वीट केले होते. मात्र याची दखल महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आज सकाळी तातडीची बैठक घेतली. त्यानंतर एमपीएससीची परीक्षा पुढे ढकल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.