लोकसभेबाबत खासदार उदयनराजेंची सावध प्रतिक्रिया

लोकसभेबाबत खासदार उदयनराजेंची सावध प्रतिक्रिया

खासदार उदयनराजे भोसले यांनी किल्ले अजिंक्यतारा रस्त्याच्या सुरू असलेल्या कामाची पाहणी केली.
Published by :
shweta walge
Published on

खासदार उदयनराजे भोसले यांनी किल्ले अजिंक्यतारा रस्त्याच्या सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. यावेळी पत्रकारांनी लोकसभा निवडणुकीबाबत प्रश्न विचारले असता त्यांनी आताच सगळं उघड केलं तर कसं होणार. लोकांचा आग्रह असतो तो पण लक्षात घेतला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट संगितलं आहे.

सातारा लोकसभा उमेदवारी बाबत खासदार उदयनराजे भोसले यांनी भाष्य करणे टाळले आहे. लोकसभा निवडणुकीला उभे राहणार की नाही? हे सगळं आता उघडकीस केलं तर कस होणार. लोकांचा आग्रह पण असतो तोही लक्षात घेतला पाहिजे असे सांगत 2024च्या लोकसभा उमेदवारी राजेंनी गुलदस्त्यात ठेवली आहे.

शरद पवारांनी बारामतीत अजित पवारांबद्दल केलेले वक्तव्य आणि साताऱ्यातील सभेत घेतलेला युटर्न याबाबत खासदार उदयनराजे भोसले यांना विचारलं असता त्यांनी पवार साहेब काय बोलले ते त्यांनाच विचारा, दुसऱ्याच्या बाबतीत मी काय बोलू शकतो. मी काय अंतर्ज्ञानी नाहीये.. अस सांगत पवारांच्या प्रश्नाला बगल दिली.

लोकसभेबाबत खासदार उदयनराजेंची सावध प्रतिक्रिया
India’s first AI school : भारतातील पहिली AI शाळा; पाहा या शाळेचं वैशिष्ट्य

दरम्यान, राज्यातील किल्ल्याच्या डागडुजी आणि संवर्धनाबाबत पर्यावरण मंत्री यांच्याशी मीटिंग घेऊन गडकिल्ल्यांच संवर्धन आणि डागडुजी बाबत चर्चा केली जाईल. गड किल्ल्याचं पर्यटन वाढवण्यासाठी जे करावे लागेल ते आम्ही करणार असल्याची ग्वाही खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com