Supriya Sule
Supriya Sule

Supriya Sule Tweet : "...तर शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार नाही"; खासदार सुप्रिया सुळेंनी केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांना केलं टॅग

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दुग्धव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी केंद्र सरकारला विनंती केली आहे.
Published by :
Naresh Shende
Published on

Supriya Sule Tweet : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दुग्धव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी केंद्र सरकारला विनंती केली आहे. केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांना टॅग करत सुळे यांनी ट्वीटरच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा समस्यांबाबत महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले आहेत.

सुप्रिया सुळे ट्वीटरवर काय म्हणाल्या?

भारत सरकारने सूर्यफूल तेल, मका, मोहरीचे तेल, दूध पावडर आयात करण्यास परवानगी दिली आहे. टिआरक्यू अंतर्गत ही आयात केली जात असून यानुसार कमीत कमी आयात शुल्क लादले जाणार आहे. सूर्यफूल आणि मोहरीच्या तेलाची आयात गैरवाजवी असल्याचा सूर उमटत असतानाच दूध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील दूध पावडरीच्या आयातीचा फटका बसू शकतो.

सध्या मूळातच दुग्धव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना डेअरीकडून मिळणारे सध्याचे भाव परवडत नाहीत. त्यात आयातीच्या या नव्या संकटामुळे डेअरीकडून मिळणारे दूधाचे दर आणखी कमी होऊ शकतात.म्हणूनच केंद्र सरकारला विनंती आहे की, ही आयात करीत असताना आपण शेतकऱ्यांना डेअऱ्यांकडून मिळणाऱ्या दरांमध्ये घट होणार नाही याची हमी द्यावी. जेणेकरून येथील दुग्धव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार नाही.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com