अमित शहा आणि डॉ अमोल कोल्हे यांच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण

अमित शहा आणि डॉ अमोल कोल्हे यांच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण

शिरुर लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची नुकतीच भेट घेतली.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

प्रमोद लांडे, शिरुर

शिरुर लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची नुकतीच भेट घेतली. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा "शिवप्रताप गरुडझेप" हा चित्रपट येत्या ५ ऑक्टोबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे त्याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यात भेट झाली आहे.

संसदेत सरकारच्या विरोधी स्पष्ट भूमिका मांडणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कार्यपद्धतीवर सभागृहात टीकास्त्र सोडणारे राष्ट्रवादीचे खासदार म्हणून डॉ. कोल्हे यांची ओळख आहे. मात्र या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. एकीकडे शिरुर लोकसभा मतदार संघ जिंकायचा म्हणून भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय मंत्री रेणुका सिंग शिरुर लोकसभा मतदार संघात गेल्या काही दिवसांत तळ ठोकून होत्या तर दुसरीकडे खासदार डॉ. कोल्हे यांनी अमित शहा यांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या आग्र्याहून सुटकेचा थरार या 'शिवप्रताप गरुडझेप' या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत खासदार, अभिनेते डॉ. अमोल कोल्हे पहायला मिळतील. थेट आग्र्यात या चित्रपटाची शुटिंग झाली असल्यामुळे अनेक प्रेक्षकांना आणि शिवप्रेमींना या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे. दरम्यान डॉ. अमोल कोल्हे आणि अमित शहा यांची भेट देखील तितकीच महत्त्वाची मानली जात आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com