गौतमी तिच्या कर्तुत्वावर आणि कलेवर पुढे जाते तेव्हा कोणाच्या पोटात दुखण्याचे कारण काय? - अमोल कोल्हे
सबसे कातील गौतमी पाटील ही नेहमी वेगवेगळ्या कारणाने चर्चेत असते. गौतमी पाटीलचे लहानांपासून ते वृध्दांपर्यंत सर्वांच जण चाहते आहेत. परंतु, आता काही मराठा संघटनांनी गौतमी पाटील हिच्या आडनावावर आक्षेप घेतला आहे. यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे.
याच पार्श्वभूमीवर आता अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अमोल कोल्हे म्हणाले की, . आज गौतमी पाटील यशाच्या शिखरावर आहे. कलाकार म्हणून ती तिची कला सादर करत आहे. तो तिचा व्यवसाय आहे. तिचे वय खूप लहान आहे. ग्रामीण भागातील तरुण आज तिच्यावर फिदा झाले आहेत. असे कोल्हे म्हणाले.
यासोबतच ते म्हणाले की, ज्यावेळी गौतमी परिस्थीत हलाखीची होती तेव्हा दोन वेळचे जेवण द्यायला यातला कोणी गेलं नाही. आज ती तिच्या कर्तुत्वावर आणि कलेवर पुढे जाते तेव्हा कोणाच्या पोटात दुखण्याची काय कारण आहे?तिने अश्लील हावभाव वाटणाऱ्या स्टेप्स करणं टाळण्यास सुरुवात केली. तरीही तिच्या कार्यक्रमांना होणारी गर्दी काही थांबली नाही. असे अमोल कोल्हे म्हणाले.