जाणून घ्या जगातील सर्वात महाग शेअर कोणता
शेअर मार्केट (share marcket)हे भारतीयांच्या आकर्षणाच एक स्थान आहे. सामान्य नागरिकांना असे वाटते की सगळ्यात श्रीमंत होण्याचा सोपा मार्ग कोणता तर ते म्हणजे शेअर मार्केट होय. परंतु त्यातील धोक्यामुळे त्यातील शेअर्सच्या (share rate)भावातील चढ-उतार यामुळे सामान्य नागरिक त्यामध्ये गुंतवणूक करत नाही. परंतु जगभरातील नामवंत उद्योगपती यामध्ये गुंतवणूक करत असतात.आज आपण जाणून घेणार आहोत, आजच्या तारखेला जगातील सर्वात महाग शेअर कोणता आहे व तो कोणत्या कंपनीचा आहे ते.
बर्कशायर हॅथवे इंक हा जगातील सर्वात महागडा स्टॉक आहे. या कंपनीच्या एका शेअरची किंमत तब्बल 4 कोटींहून अधिक आहे.20 एप्रिलपर्यंत, बर्कशायर हॅथवे इंकच्या शेअरची किंमत 523550 डॉलर (4,00,19,376 रूपये) आहे. प्रत्येक गुंतवणूकदाराला या कंपनीत पैसे गुंतवायचे आहेत, परंतु ज्याची किमान 4 कोटी रुपये गुंतवायची ताकद असेल, केवळ तोच हा शेअर खरेदी करू शकतो. त्यामुळे बर्कशायर हॅथवे इंकमध्ये (Berkshire Hathaway Inc.) गुंतवणूक करणे हे बहुतेक लोकांसाठी स्वप्नच राहते.
वॉरन बफे (Warren Buffett) हे जगातील सर्वात महाग स्टॉक कंपनी बर्कशायर हॅथवे इंकचे प्रमुख आहेत.जगभरातील दिग्गज गुंतवणूकदार वॉरेन बफे यांना फॉलो करतात. असे म्हणतात की वॉरन बफेट ज्या कंपनीत गुंतवणूक करतात, तिचे दिवस बदलतात. फोर्ब्सच्या मते, वॉरन बफेट यांची बर्कशायर हॅथवेमध्ये 16 टक्के भागीदारी आहे.कंपनीचा बहुतांश व्यवसाय अमेरिकेत आहे. कंपनीत सुमारे 3,72,000 कर्मचारी काम करतात. बर्कशायर हॅथवे इंक. अमेरिकेशिवाय चीनमध्येही विस्तार करण्याची योजना आहे. 1965 मध्ये जेव्हा वॉरेन बफेट यांनी या टेक्सटाईल कंपनीची कमान हाती घेतली तेव्हा तिच्या शेअरची किंमत 20 डॉलरपेक्षा कमी होती.