Monsoon
Monsoon Team Lokshahi

Monsoon Rain : राज्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज

मान्सूनचा प्रवास सध्या संथ गतीने सुरु आहे. पण येत्या दोन ते तीन दिवसांत मान्सून केरळमध्ये दाखल होईल.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

मान्सूनचा प्रवास कुठेतरी थांबला आहे. मात्र दोन ते तीन दिवसांत मान्सून केरळमध्ये दाखल होणार असल्याची माहिती मिळत आहे.

अरबी समुद्रात गेल्या दोन दिवसांपासून मोसमी वारे वाहायला सुरुवात केली आहे. तसेच राज्यात काही भागात मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. (Rain in Maharashtra)

कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ाच्या प्रामुख्याने दक्षिण भागात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com