मोदींनी पुन्हा एकदा करुन दाखवलं! लोकप्रिय जागतिक नेत्यांच्या यादीत पटकावलं पहिलं स्थान
लोकप्रिय जागतिक नेत्यांच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिलं स्थान पटकावलं आहे. सलग तिसऱ्यांदा नरेंद्र मोदींनी पहिला क्रमांक मिळवला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना यादीमध्ये ४१ टक्के रेटिंगसह पाचवं स्थान मिळालं आहे. बायडन यांच्यानंतर कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो सहाव्या क्रमांकावर आहेत. त्यांना ३९ टक्के रेटिंग आहे. तर सातव्या क्रमांकावर ३८ टक्के रेटिंगसह जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा आहेत.
अमेरिकेतील डेटा इंटेलिजन्स कंपनी ‘मॉर्निग कन्सल्ट’च्या सर्व्हेक्षणानुसार, ७५ टक्के रेटिंगसह नरेंद्र मोदी अग्रस्थानी राहिले आहेत. नरेंद्र मोदी यांच्यानंतर अनुक्रमे मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष मॅन्यूअल लोपेज ओब्राडोर आणि इटलीचे पंतप्रधान मारियो द्राघी यांचा क्रमांक आहे. ओब्राडोर यांना ६३ टक्के रेटिंग असून, मारियो यांची रेटिंग ५४ टक्के आहेत. या यादीत जगभरातील एकूण २२ नेते आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याआधीही नोव्हेंबर २०२१ आणि जानेवारी २०२२ मध्ये यादीत पहिलं स्थान मिळवलं होतं.