मनसेची पाचवी यादी जाहीर; 15 उमेदवारांची घोषणा

मनसेची पाचवी यादी जाहीर; 15 उमेदवारांची घोषणा

मनसेची पाचवी यादी जाहीर, 15 उमेदवारांची घोषणा. पनवेलमधून योगेश चिलेंना संधी, काटोलमधून सागर दुधानेंना उमेदवारी.
Published by :
shweta walge
Published on

विधानसभा निवडणुकीसाठी मनसेची पाचवी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत 15 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. पनवेलमधून योगेश चिलेंना संधी तर काटोलमधून सागर दुधानेंना उमेदवारी देण्यात आली आहे.

मनसेच्या पाचव्या यादीत कोणाचा समावेश?
पनवेल – योगेश चिले
खामगाव – शिवशंकर लगर
अक्कलकोट – मल्लिनाथ पाटील
सोलापूर शहर मध्य – नागेश पासकंटी
जळगाव जामोद – अमित देशमुख
मेहकर – भैय्यासाहेब पाटील
गंगाखेड – रुपेश देशमुख
उमरेड – शेखर टुंडे
फुलंब्री – बाळासाहेब पाथ्रीकर
परांडा – राजेंद्र गपाट
उस्मानाबाद – देवदत्त मोरे
काटोल – सागर दुधाने
बीड – सोमेश्वर कदम
श्रीवर्धन – फैझल पोपेरे
राधानगरी – युवराज येडुरे

दरम्यान,  मनसे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात मनसे उमेदवार देणार नसल्याची माहिती समोर आली आहे. कोपरी पाचपाखाडी मतदार संघात अभिजित पानसे यांची उमेदवारी निश्चित झाली होती, मात्र आता उमेदवारी न देण्याचा निर्णय पक्षाकडून घेण्यात आला आहे. तर मनसे स्वबळावर निवडणूक लढवत असून आतापर्यंत 5 उमेदवार याद्या मनसेने जाहीर केल्यात.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com