Raj Thackeray
Raj Thackerayteam lokshahi

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर औरंगाबादमध्ये गुन्हा दाखल, अटकेची शक्यता

Published by :
Shweta Chavan-Zagade
Published on

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray )औरंगाबादच्या (aurangabad)सभेमुळे अडचणीत आले आहेत. या सभेसाठी पोलिसांनी राज ठाकरेंना काही अटी घालून दिल्या होत्या. या अटींचं पालन न केल्यास पोलीस राज ठाकरेंवर कारवाई करणार असा इशाराही देण्यात आला होता. आता त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी (police action)कारवाईस सुरूवात केली आहे.

Raj Thackeray
मुंबईमधील 803 मशिदींवरील भोंग्यांना परवानगी

राज ठाकरे यांच्याविरोधात अजामीनपात्र गुन्ह्याची नोंद आहे. दोन समुहांमध्ये भांडण लावल्याचा आरोप ठाकरेंवर करण्यात आलाय. त्यामुळे ठाकरे यांच्या अटकेची शक्यता वर्तवली जात आहे.

प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. १ मे रोजी औरंगाबाद येथे घेतलेल्या सभेत त्यांनी प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या १६ पैकी १२ अटींचा भंग केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, राज ठाकरे यांच्यांवर गुन्हा दाखल होताच मनसे पदाधिकाऱ्यांची पुन्हा बैठक बोलवली आहे.

मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालिसा प्रकरणात आता पोलिसांनी कठोर भूमिका घेणार असल्याचं राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केलं आहे. त्यानंतर आता औरंगाबादमध्ये ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

Raj Thackeray
राज ठाकरे म्हणजे परिवर्तनवादी भोंगा; सेनेच्या भास्कर जाधवांचा टोला

संजय राऊत म्हणतात, असे आमच्यावर अनेक गुन्हे

राज ठाकरे यांच्यांवर गुन्हा दाखल होताच संजय राऊत यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिला. ते म्हणाले, आमच्यावर असे अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. प्रक्षोभक भाषण करणे, अग्रलेख लिहिणे हे गुन्हे आमच्यावर आहे. कायद्यापेक्षा कोणी मोठे नाही.

राज्यात बाहेरुन लोक आणून दंगली

राज्यात बाहेरुन लोक आणून दंगली घडवण्याचा प्रयत्न होणार असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. राज्यात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न आहे.

मनसे आंदोलनावर ठाम

दरम्यान, राज ठाकरे यांच्यांवर गुन्हा दाखल झाला असला तरी मनसे उद्याच्या आंदोलनावर ठाम आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी या तीन भाषेत पत्रक काढून मनसे आपली भूमिका लवकरच स्पष्ट करणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे देशभरातील हिंदू बांधव आणि महाराष्ट्रातील मनसे कार्यकर्ते यांना संबोधित करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मनसे कार्यकर्त्यांना नोटीसा

दुसरीकडे उद्याचं आंदोलन लक्षात घेता गृहविभाग अॅक्शन मोडमध्ये आला आहे. मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना नोटीस पाठवल्या जात आहेत. मनसे नेते बाळा नांदगावर, संदीप देशपांडे नितीन सरदेसाई यांच्यासह राज्यभरातील पदाधिकाऱ्यांना नोटीस पाठवण्यात आल्या आहेत. औरंगाबादमध्ये मनसेच्या 3 शहराध्यक्षांसह 40 जणांना कलम 149 अन्वये गुन्हा प्रतिबंधक नोटीस पाठवण्यात आली आहे.

Raj Thackeray
राज यांच्या तीन सभा, वाचा प्रत्येक सभेत काय म्हणाले...
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com