MNS
MNSTeam Lokshahi

रस्त्यांबाबत अधिकारी मुख्यमंत्र्यांना फसवतायत-राजू पाटील

रस्त्यांबाबत अधिकारी मुख्यमंत्र्यांना फसवतात मुख्यमंत्र्यांना एकदा शहरात येऊन पाहिलं पाहिजे रस्त्याची खरी परिस्थिती कळेल.
Published by :
Sagar Pradhan
Published on

अमजद खान। कल्याण: एका रस्त्याचे काम करून अधिकारी मुख्यमंत्र्यांना फसवत आहेत, मुख्यमंत्र्यानी एकदा येऊन रस्त्यांची पाहणी करावी अशी टीका मनसे आमदार राजू पाटील यांनी केली. डोंबिवलीत आज मुख्यमंत्र्यांचं आगमन होण्यापूर्वी ज्या रस्त्याने मुख्यमंत्री येणार आहेत त्या रस्त्यावरील महापालिकेकडून खड्डे भरले गेले आहेत. त्याबाबत मनसे आमदार राज पाटील यांनी प्रतिक्रिया दिली तर सोबतच जितेंद्र आव्हाड यांनी डोंबिवली संदर्भ केलेल्या टीकेचं समर्थन केलं आहे.

MNS
Dasara Melava: शिवसेना, शिंदे गटाच्या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस सज्ज

मुख्यमंत्री येणार आहे कल्याण मुंबई येथील मुख्यमंत्र्यांच्या आगमनाच्या रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात आले होते तर दुसरीकडे आज सकाळी जितेंद्र रस्त्यांवरूनच अप्रत्यक्षरीत्या सत्ताधाऱ्यांवर टीका केली होती. याबाबत बोलताना आमदार राजू पाटील यांनी एका रस्त्याचे काम करून अधिकारी मुख्यमंत्र्यांना फसवत आहेत, मुख्यमंत्र्यानी एकदा येवून रस्त्यांची पाहणी करावी अशी टीका मनसे आमदार राजू पाटील यांनी केली.

डोंबिवलीत आज मुख्यमंत्र्यांचं आगमन होण्या पूर्वी ज्या रस्त्याने मुख्यमंत्री येणार आहेत ते रस्ते भरले गेले त्यात रस्त्यावरील खड्डे भरले गेले त्याबाबत मनसे आमदार राज पाटील यांनी प्रतिक्रिया दिली तर जितेंद्र आव्हाड यांनी आज डोंबिवलीत येऊन रस्त्यावरील खड्ड्यांबाबत केलेल्या टीकेचं मनसे आमदार राजू पाटील यांनी समर्थन केले आहे. त्यावेळी ते म्हणाले की, आव्हाड यांना बोलायचं अधिकार आहे, गेल्या १० वर्षात त्यांनी मुंब्रा कलावाचा कायापालट केलाय इथे गेली २५ वर्ष परिस्थीत तशीच आहे , राजकारणा पलीकडे काही गोष्टी पाहिल्या पाहिजेत असे विधान यावेळी त्यांनी केले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com