Prakash Mahajan Press Conference
Prakash MahajanGoogle

Prakash Mahajan: मनसे नेते प्रकाश महाजनांचं मोठं विधान, म्हणाले "विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीला पर्याय..."

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी मेळाव्यात राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकलं. मनसे २२५ ते २५० जागा लढविणार असल्याचं ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
Published by :
Naresh Shende
Published on

Prakash Mahajan On Mahayuti And Mahavikas Aaghadi: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी मेळाव्यात राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकलं. मनसे २२५ ते २५० जागा लढविणार असल्याचं ठाकरे यांनी स्पष्ट केलं. त्यानंतर राजकीय वर्तुळात मनसेच्या भूमिकेबाबात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. याच पार्श्वभूमीवर मनसे नेते प्रकाश महाजन यांनी माध्यमांशी बोलताना मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

प्रकाश महाजन काय म्हणाले?

आम्ही महाराष्ट्राचा तिसरा पर्याय देऊ शकतो. महायुती, महाविकास आघाडीपेक्षा राज ठाकरे हे तिसरा पर्याय महाराष्ट्राला ठरू शकतात. त्या दृष्टीने आम्ही आता पहिलं पाऊल टाकलेलx आहे. म्हणून राज ठाकरे यांनी स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. युती किंवा आघाडीत जायचा निर्णय घेतला नाही. कालच्या मेळाव्यात त्यांनी तसं जाहीर केलं. त्यामुळे त्यांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयामुळे कार्यकर्त्यांमध्ये खूप उत्साहाचे वातावरण आहे आणि प्रत्येक कार्यकर्ता राज ठाकरे यांच्यासाठी पूर्ण ताकदीने काम करेल.

२००८ पासून राज ठाकरे यांच्यासारखा कडवा विज्ञानवादी हिंदू होणे नाही. राज ठाकरे यांचे हिंदूत्व आधुनिक आहे. त्यामुळे महाराष्ट्रालाच नाही, तर देशालाही त्यांची गरज आहे. दीपक केसरकरला स्वप्न बघायला हरकत नाही. महायुतीत त्यांना किती अधिकार आहे, आधी याचं संशोधन त्यांनी करावं. त्यामूळे राज ठाकरे हा त्यांच्या आवाक्याच्या बाहेरचा विषय आहे. राज ठाकरे त्यांच्या सोबत यावे, असे त्यांना वाटत असेल, म्हणजे राज ठाकरे साहेब आता योग्य ट्रॅकवर चालले आहेत, असंही महाजन म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com